No menu items!
Tuesday, September 16, 2025

मराठा युवक संघाच्या विसाव्या भव्य आंतरराज्य अंतर शाळा व आंतर कॉलेज जलतरण स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात

Must read

गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावावरती मराठा युवक संघ, आबा स्पोर्ट क्लब व हिंदी स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने आंतरराज्य अंतर शाळा व कॉलेज यांच्या स्पर्धेला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे नगरसेवक श्री रवी साळुंखे, मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर उपाध्यक्ष मारुती देवगेकर, सेक्रेटरी चंद्रकांत गुंदकल, अर्बन बँकेचे संचालक श्रीकांत देसाई, मराठा बँकेचे शेखर हांडे, बेकर्स संचालक श्री शिवाजीराव हंगीरगेकर माजी नगरसेवक नेताजी जाधव, सुहास किल्लेकर त्याचबरोबर आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलभत्ते, सेक्रेटरी शुभांगी मंगळूरकर, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, ज्योती पवार विजया शिरसाठ व इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मराठा युवक संघाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब काकतकर यांनी प्रस्तावना केली, यामध्ये मराठा युवक संघाने गेल्या वीस वर्षापासून जलतरण स्पर्धा आपण कशा पद्धतीने भरवलेल्या आहेत याची सविस्तर माहिती दिली व पूर्वी या स्पर्धा किल्ल्याच्या तलावामध्ये आम्ही भरवत होतो कालांतराने तलावाचे पाणी दूषित झाल्यामुळे मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी या जलतरण तलावामधल्या स्पर्धा चालू केल्या आणि या स्पर्धेतून अनेक नामवंत असे खेळाडू बेळगाव मध्ये तयार झाले. यानंतर उपस्थित पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. स्पर्धेची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे श्री रवी साळुंखे त्याचबरोबर अध्यक्ष मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, मारुती देवगेकर, चंद्रकांत गुंदकल, शिवाजी हंगरगेकर, नेताजी जाधव, शितल हुल उपस्थित होते

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!