बेळगाव तालुक्यात सार्वजनिक शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात १४ सप्टेंबर रोजी मद्यविक्री बंदी घालण्यात आली आहे. ईद-मिलाद उत्सवाची १४ सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ ते १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत मद्य विक्री बंदी असणार आहे. या काळात मद्यविक्री दुकाने, वॉईन शॉप्स, बार, क्लब आणि हॉटेल्समध्ये दारू विक्री आणि वाहतूक बंदी असणार आहे, असा आदेश निवासी जिल्हाधिकारी विनयकुमार होनकेरी आणि शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी बजावला आहे.