राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देण्यात येणारा राज्य पातळीवरील सर्वोत्कृष्ट निवडणूक अधिकारी पुरस्कार हा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे . सदर पुरस्कार त्यांना भारतीय निवडणूक आयोगातर्फे बंगलोर येथील टाऊन हॉलमध्ये उद्या बुधवार दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय मतदार समारंभात राज्यपाल स्थावरचंद्र गहलोत यांच्या हस्ते बेंगलोर येथे पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. सदर पुरस्कार भारतीय निवडणूक आयोग आणि कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहीर केला आहे.
सदर पुरस्कार हा बेळगाव तुमकुर यादगीर उडपी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रधान करण्यात येणार असून त्यांनी मतदार नोंदणी तपासणी वगैरे निवडणुकीशी संबंधित सर्व कामे उत्तमरीत्या पार पाडल्याने त्यांना हा सर्वोत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
त्याबरोबर या समारंभात जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी निवडणूक तांत्रिक विभागाचे कर्मचारी सहाय्यक निवडणूक अधिकारी मतदान बूथ अधिकारी यांना देखील हा पुरस्कार दिला जाणार आहे.