महिला विद्यालय हायस्कूलचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. मेधा मराठे, तसेच महिला विद्यालय मंडळाच्या चेअरपर्सन डॉ. सौ. शोभा शानभाग, श्री किरण मोघेसर आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही. एन. पाटील सर उपस्थित होते. सुरुवातीला शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत, शालागीत सादर केले. मुख्याध्यापक श्री व्ही. एन. पाटील सरांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिला व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री के. एन. पाटील सर यांनी या शैक्षणिक वर्षाचे अहवाल वाचन सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी सजवलेले हस्तलिखित ‘शततरंग’ याचे पाहुण्यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले. वर्षभर झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. तसेच एस. एस. एल. सी. 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत शाळेत प्रथम आल्याबद्दल शाळेच्या माझी शिक्षिका कै. वैजयंती आठवले यांच्या स्मरणार्थ श्री आदित्य राव यांनी लॅपटॉप पारितोषिक देऊन कु. तनिष्का कांबळे हिला गौरवण्यात आले. तसेच विविध विषयांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थिनींना भरघोस पारितोषिके देण्यात आली त्याचबरोबर इतर भाग घेतलेल्या विद्यार्थ्यािंनींना सुद्धा यावेळी बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्राथमिक विभागातून कु. समृद्धी प्रकाश सांबरेकर हिला सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून गौरवण्यात आले, तर माध्यमिक विभागातून कुमारी शामल भरमा हिरोजी हिला सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीचा मान मिळाला. यानंतर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या सौ. मराठे मॅडम यांनी विद्यार्थिनींनी पुढे जाऊन आयुष्यात चांगले माणूस व्हा आणि चांगल्या स्त्री व्हा असा संदेश देताना भारतातील विविध क्षेत्रातल्या पहिल्या महिलांचा त्यांच्या कार्याचा उत्कृष्ट असा भाग विद्यार्थिनींना सांगितला, त्यातून प्रेरणा घ्या आयुष्यात खूप काही छान करा, चांगले करा, असा मोलाचा संदेश दिला. यानंतर दुपारच्या सत्रामध्ये इयत्ता सहावी इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी नाट्यछटा, कथाकथन, नाटक, पोवाडा, लावणी, बालनृत्य, कोळी नृत्य अशा विविध मनोरंजनाच्या छटा सादर केल्या आणि स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. नेहा भातकांडे तर आभार सहशिक्षिका सौ. अर्चना जांबोटकर यांनी केले. कार्यक्रमाला मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ पाटील यांचे लाभले, तसेच स्नेहसंमेलन उत्तमरित्या पार पडण्यास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले
महिला विद्यालय हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
By Akshata Naik
Previous articleज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेचे स्नेहसंमेलन साजरे
Next articleगांजा प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करा