ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेचे स्नेहसंमेलन साजरे
बेळगाव प्रतिनिधी
शास्त्रीनगर येथील दि आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले .यावेळी मराठा मंदिर संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या प्रशासक भक्ती मनोहर देसाई उपस्थित होत्या. तसेच पालक प्रतिनिधी राजशेखर चिकोर्डे, अप्पोशी नाईक, मोहन देवासी, प्रकाश पाटील, कस्तुरमल परमार हे उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका अलका जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले . शाळेच्या व्यवस्थापिका भक्ती देसाई यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. त्यावेळी आदर्श विद्यार्थी म्हणून कुमार पार्थ सांबरेकर तर आदर्श विद्यार्थिनी कुमारी निधी पाटील व हुशार विद्यार्थिनी म्हणून तेजस्विनी बसरीकट्टी यांना गौरविण्यात आले. यावेळी मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले .या कार्यक्रमासाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका फरीदा मिर्झा व सर्व शिक्षक वर्गाचे सहकार्य लाभले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आराध्या पालसिंग हिने केले व आभार प्रदर्शन तनुजा रविन हिने केले.