मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या एका व्यक्तीला सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडून उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात पाठविले .एक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मानसिक अवस्थेत आढळला. त्याची मानसिक स्थिती खराब असल्याने नागरिकांना मारण्यासाठी त्यांच्यावर दगड फेकत होता .
तसेच त्याच्या हातामध्ये अर्धी कापलेली ब्लेड होती त्यावेळी या व्यक्तीची अवस्था पाहून काही नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्याशी संपर्क साधला आणि प्रसंगावधान राखत त्या व्यक्तीला पकडून रुग्णवाहिकेत पाठविले त्यानंतर त्या व्यक्तीची आरोग्य तपासणी करिता जिल्हा रुग्णालयात हलविले .याकामी पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी ,खडेबाजार पोलिस स्टेशनचे पी एस आय आर बी सौदागर, हवालदार एस एस ध धूपधल्ली यांचे मोलाचे सहकार्य लाभले.