विजापूर येथील देवराज हिप्परगी प्रथम श्रेणी महाविद्यालयात आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठ आंतरमहाविद्यालय ॲथलेटिक्स स्पर्धेत बेळगावच्या भरतेश महाविद्यालयाने यश मिळवले आहे.
यास्पर्धेत भरतेश महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनीनी नव्या विक्रमाची नोंद करत भरतेश महाविद्यालयाने राणी चन्नम्मा विद्यापीठ आंतर महाविद्यालयात भरतेशचे नाव कोरले आहे. यंदाच्या वर्षात भरतेश महाविद्यालयाने जनरल चॅम्पियनशिप मिळविली आहे.
जाफरखान सरोवर हा सर्वोत्तम ॲथलेटिक्स स्पर्धक किताब तर स्पर्धेत तुषार भेकने 800 मी,1500 मी धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक,जाफरखान सरोवर लांबउडी व तिहरीउडी यामध्ये सुवर्ण श्रीकांत कांबळे 100 मी रौप्य पदक तर 200 मी सुवर्ण,श्रीनी हिरापाचे 400 मी अडथळा शर्यत रौप्य पदक,नीलेश पाटील 10 किलो मीटर धावणे पाचवा व 21 किलो मीटर रौप्य , चैतन्य मूदलीयर 400 मी सुवर्ण,स्वस्तिक मिरजकर हातोडाफेक रौप्य पदक,यशराज तोडकर तिहरीउडी कास्यपदक,4×400 रिले स्पर्धेतत तुषार भेकने,श्रीकांत कांबळे, चैतन्य मूडलीयर,नवा रेकॉर्ड सहित सुवर्णपदक, यापूर्वी राणी चन्नम्मा विद्यापीठात लिंगराज महाविद्यालयाचा तिन्ही क्षेत्रात धबधबा होता पण भरतेशने सर्वसाधारण जेतेपद पटकावत धक्का दिला आहे.
वरील सर्व खेळाडूंना महाविद्यालया सोसायटीचे सभासद श्रीपाल खेमलापुरे,विनोद दोडणावर, हिराचंद कलमनी व प्राध्यापक सुनिता देशपांडे समन्वय नीता गंगारेड्डी यांचे प्रोत्साहन लाभत आहे तर प्रदीप जुवेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.