आज सर्व समाज बंधू-भगिनींच्या उपस्थितीत प्रतिवर्षा प्रमाणे
श्री नामदेव दैवकी संस्थेंच्या वतिने
७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणेयात आला.
सकाळी ८.००वा.
मा. अध्यक्ष श्री अजित दत्तात्रय कोकणे
यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
अध्यक्षीय भाषणात
श्री अजित कोकणे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देवून मार्गदर्शन केले. समाजाची प्रगती,एकात्मता,शैक्षणिक कार्यात समाज पुढे घेउन जाण्यासाठी तत्पर राहुन संस्थेच्या यशस्वी कार्यात समाज बांधवानी सहभागी होण्याचे आवहान त्यांनी केले.
नंतर सौ. शुभांगी महेश खटावकर आणि चिमुकला चि.निधीश शैलेश उंडाळे यांनी देशभक्ती पर भाषणं केली. कु.नव्या कुमार माळवदे हिने भारत मातेच्या वेशभूषेत उपस्थित राहुन सर्वांचे लक्षवेधुन घेतले होते.
समाजातील कार्यकर्ते वारकरी सांप्रदायातील अभ्यासु व्यक्तिमत्व आणि नावाजलेले चार्ज अकाउंट (CA)
श्री राजेश बाळकृष्ण पतंगे यांचा अकाउंट क्षेत्रातील
I.S.A 3.0 ह्या नामवंत परिक्षेत उत्तुंग यश मिळविल्या बद्दल समाजाच्या वतिने गौरवाध्यक्ष
श्री नारायणराव काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
समाजातील मान्यवरांचे स्वागत उपाध्यक्ष श्री अशोक रेळेकर यांनी केले.
त्या नंतर तिरंगा रॅलीस सुरवात झाली. शेकडो समाज बांधवांच्या उत्स्पुर्त सहभागाने शहरातील गणपत गल्ली,मारुती गल्ली किर्लोस्कर रोड, कॅालेज रोड, चन्नमा सर्कल काकती वेस रोड वरुन श्री संत नामदेव मंदिर प र्यंत रॅली निघाली. शेवटी श्रीसंत नामदेव मंदिर मध्ये महाआरती ने कार्यक्रमाची सांगता झाली.
रॅली यशस्वी करण्यासाठी
सुहास खटावकर, प्रविण कणेरी, प्रवीण महिंद्रकर,महेश खटावकर, नारायण(राजु) कुमठेकर, विश्वनाथ पिसे, संतोष राजगोळकर आणि अमर कोपार्डे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री शशिकांत हावळ यांनी केलं.
या कार्यक्रमास खजिनदार रोहण उरणकर संचालक दिपक खटावकर,भाऊ मुसळे, सुनिल कोरडे, हेमंत हावळ,निरंजन बोंगाळे,सुरेशपिसे,कार्यकर्ते, महीला मंडळ, युवा महिला आणि शेकडोंच्या संखेने समाज बांधव भगिनी उपस्थितीत होते.