यंग बेलगाम फाउंडेशनतर्फे 77 व्या स्वातंत्र्य दिनासह दिवंगत मित्र तनय हुईलगोळ याच्या वाढदिवसानिमित्त आज एसएचयु आश्रम खासबाग येथे ब्लॅंकेट, कपडे, मिठाई आणि फळांचे वाटप करण्यात आले.
जय भारतमाता नगर ग्रामीण संस्था कामखांडू आणि बेळगाव महापालिकेकडून एसएचयु आश्रम खासबागची देखभाल केली जाते. यंग बेलगाम फाउंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी आज बुधवारी या आश्रमाला भेट दिली. तसेच तेथे आश्रयास असलेल्यांची विचारपूस करण्याबरोबरच त्यांना ब्लँकेट, कपडे, मिठाई व फळांचे वाटप केले. याप्रसंगी चेर्ली विजय मोरे, सोनिया फ्रान्सिस, श्रीनिधी होलेप्पगोळ, संदीप सोमनट्टी, आदित्य गावडे, अमिष देसाई, कार्तिक पाटील, अद्वैत चव्हाण -पाटील, ओमकार बैलूरकर, प्रणव बेळगावकर आणि ॲलन विजय मोरे हे उपस्थित होते.