भांदूर गल्ली येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा नंबर सात मध्ये उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी त्यांचा शाल श्रीफळ आणि भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सत्काराला उत्तर देताना विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात कशाप्रकारे वागले पाहिजे. आपल्या पालकांचा कशाप्रकारे आदर केला पाहिजे.
तसेच शिक्षकांच्या मदतीने आपले नाव उज्वल केले पाहिजेत त्याबद्दल मार्गदर्शन केले. प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी आमदारांचे स्वागत केले. त्यानंतर सरस्वती फोटो पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी या कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.