बेळगाव मध्ये चित्रित आणि प्रदर्शित झालेल्या दडपण या चित्रपटाला उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स पुरस्कार मिळाला आहे. संपूर्ण कर्नाटकातील सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा पुरस्कार त्यांना जाहीर झाली असल्याने सर्वत्र चित्रपटाची सध्या कौतुक करत आहेत
अस्मिता क्रिएशन बेळगावचे संस्थापक निर्माता राजेश लोहार यांना धारवाड येथील उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स ने अशा आशयाचे पत्र पाठवले आहे.
दडपण आता विराम आत्महत्येला असे चित्रपटाचे नाव असून विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्ये या चित्रपटांमध्ये मोठी जनजागृती निर्माण केली आहे.
चित्रपटांमुळे निश्चितच आत्महत्यांना आळा बसेल आणि जागृती निर्माण होईल असे जनतेने मत निर्माण केले आहे. आज बरोबर संघटनेकडून हा चित्रपट नोंदणीकृत आणि अधिकृत होत असल्याचा अभिमान आहे.
या पत्रात त्यांनी असे लिहिले आहे की तुमचा दडपण हा चित्रपट संपूर्ण कर्नाटकातील पहिला मराठी चित्रपट आहे त्याची घोषणा करताना आम्हाला खूप अभिमान वाटत आहे त्याकरिता आम्ही फिल्म चेंबर तर्फे या चित्रपटाला गौरवण्याबरोबरच संपूर्ण कर्नाटकातील सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर करत असल्याचे सांगितले आहे.
तसेच येत्या 20 ऑगस्ट रोजी बेळगावला येऊन पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच दडपण चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा गौरव देखील करणार असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.