काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी चेतक कांबळे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. चेतक कांबळे यांनी अनुसुचित जाती वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याआधीही त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले असून त्यांचे वडिल यल्लाप्पा कांबळे यांनी उपाध्यक्षपदही भूषवले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवाजी राक्षे, निरंजन जाधव, चंद्रकांत धुडूम, कल्लाप्पा चौगुले, यल्लाप्पा बेळगांवकर, युवराज पावले, लक्ष्मण पावशे, सोमान्ना कोले, पिराजी पाटील, संजय आलोजी, उमेश चौगुले, अशोक घुग्रेटकर, बाळू चौगुले, बाळू पाटील, सिद्धाप्पा माळगी , प्रकाश राठोड , पुंडलीक पाटील , गजानन घुग्रेटकर , अमोल पवार , शांतीराज घुग्रेटकर , कोमल कांबळे , राजू पावशे , सूरज पाटील , जोतीबा राजाई , लक्ष्मण आलोजी यांचेसह शेतकरी वर्ग उपस्थित होते .आदी उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर चेतक कांबळे यांनी कारखान्याच्या कामकाजाची आपल्याला माहिती असून शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले.