बेळगाव बार असोशिएशन तर्फे बेळगाव न्यायालयातील बढ़तीनिमित्त बदली झालेला तीन न्यायाधिशांचा मा. गणपती भट, प्रधान दिवाणी न्यायाधिश द्वितीय श्रेणी मा श्रीमती शर्मिला कामत, प्रथम अतिरिक्त दिवाणी न्यायाधिश द्वितीय श्रेणी व मा. थी संजीवकुमार वं हिंडोड्डी, मा. साळवे ओ. एम.एफ.सी. बेळगाव यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सन्मान करून निरोप देण्यांत आला.
सदरचा निरोप समारंभ बेळगांव बार असोसएशनचे अध्यक्ष ॲड सुधीर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रधान सत्त जिल्हा न्यायाधिशा श्रीमती एल. विजयालक्ष्मीदेवी उपस्थित होत्या.
याप्रसंगी सन्मान मूर्तीनी बेळगाव न्यायालयातील आपले अनुभव कथन केले. याप्रसंगी बेळगाव बार असोसिशनचे सचिव गिरीश पाटील, सहसचीव, ॲड बंटी कपाई, उपाध्यक्ष सचिन शिवन्नावर महिला प्रतिनिधी पूजा पाटील, सदस्य वकील महांतेश पाटील ॲडआदर्श पारीक आदी तसेच वकिल वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.