दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी शेवटच्या श्रावण सोमवारी सर्व लोकसेवा फाउंडेशन चे अध्यक्ष श्री वीरेश बसया हीरेमठ यांच्यावतीने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी संपूर्ण जगभर जागतिक आजी-आजोबा दिवस साजरा केला जातो पण सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री विरेश बसय्या हिरेमठ हे वेगवेगळे सामाजिक उपक्रम हाती घेत असतात .समाजाचे आपण देणे लागतो हे मनात कायमस्वरूपी स्मरून समाजात साजरे होत चाललेले हे वेगवेगळे दिवस आपल्या कल्पकतेने साजरे करतात, खरं म्हणजे वसुदेव कुटुंबकम आपण जगाला शिकवत आहे पण आपल्याच घरातील आधारवड अनेक वृद्धाश्रमात आपले कुटुंब शोधत असतात आणि घरात मोठ्या रुबाबात या ऑनलाइनच्या जगात आजी आजोबा दिवस फक्त सेल्फी साठी साजरा केला जातो. वृद्धाश्रमात असलेले असे अनेक आजी आजोबा नवीन कपड्यांसाठी चातकाप्रमाणे वाट बघत बसलेली दिसतात कारण तिथपर्यंत नातवंडे पोहोचतच नाही अशा सर्व आजी-आजोबांचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रीमती चन्नम्मा बसवंतया हिरेमठ वृद्धाश्रम देवराज आरास कॉलनी बसवान कुडची बेळगाव या वृद्धाश्रमात सर्व आजी-आजोबांचे नातू म्हणून पोहोचले ते सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री विरेश बसय्या हिरेमठ व त्यांचे कार्यकर्त सहकारी. कित्येकांच्या घरी आहेर स्वरूपात आलेले किंवा न वापरलेल्या अनेक साड्या ट्रंक भरून घरात कपाटात ठेवलेल्या असतात त्यांची खरी गरज ओळखून श्री। विरेश बसय्या हिरेमठ यांनी आवाहन केले की वृद्धाश्रमात साड्या देण्यासाठी समाजातील दाते यांनी पुढाकार घ्यावा आणि त्याप्रमाणे ट्रंक भरून साड्या जमा झाल्या आणि त्या सर्व साड्या या दात्यांना व तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतलेले बेळगावचे नवरत्न पैकी एक श्री वीरेश हिरेमठ यांच्या सहकार्याने या वृद्धाश्रमात सदरच्या साड्या पोहोच करण्यात आल्या तसेच इथून पुढे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी अशा प्रकारचे कपडे वृद्धाश्रमात देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री वीरेश हिरेमठ यांच्या वतीने करण्यात आले.
शेवटच्या श्रावणी सोमवारच्या दिवशी साजरा झाला आगळावेगळा आजी आजोबा दिवस
By Akshata Naik
Previous articleअलारवाड येथील पाणी पुरवठा केंद्राला भेट
Next articleबेळगाव बार असोसिएशनतर्फे न्यायाधिशांना निरोप