काळादिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक २२ रोजी दुपारी ठिक २.०० मराठा मंदिर (रेल्वेओव्हरब्रिज) येथे हि बैठक आयोजित करण्यात आली आहे.
१ नोव्हेंबर १९५६ रोजी सीमाभाग अन्यायाने त्यावेळच्या म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यात डांबण्यात आला. या अन्यायाविरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती प्रतिवर्षी काळादिन पाळण्यात येतो. या काळादिना संदर्भात चर्चा करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी,आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस अँड एम जी पाटील यांनी कळविले आहे.