श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे सातवे पुष्प संपंन झाले. मिलिटरी महादेव येथून महादेवाची आरती करुंन सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे एस के पाठक यांच्याहस्ते ध्वज चढवून
प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात करण्यात आली. कॅम्प येथील प्रमुख मार्गावरून फिरून जत्तीमठ येथील दुर्गा देवी मंदिरात पोहचली. यावेळी विजयराव देशमुख लिखित “शककर्ते शिवराय” या पुस्तकाबद्दल छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर येथील मंगेश बरबडे मनीष उधव, राम देशपांडे यांच्या वतीने माहिती देण्यात आली. त्यानंतर पूर्व वीभाग प्रमुख प्रचारक हिरामणी मुचंडीकर यांचे गोहत्या तसेच दुर्गामाता दौड आपण का काढतो याविषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर आरती करून ध्येय मंत्र म्हणण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक शिरीष गोगटे आणि उद्योजक मुकेश कामटे यांच्याहस्ते ध्वज उतरण्यात आला.
उद्याची श्री दुर्गामाता दौड अंबाबाई देवस्थान शहापूर येथून प्रारंभ होऊन बसवेश्वर चौक येथे सांगता होणार आहे. या दौडीसाठी विशेष प्रमुख उपस्थिती म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रावसाहेब देसाई उपस्थित असणार आहेत.
तसेच
हिरोजी इंदुलकर यांच्या वारसदारांची उपस्थिती असणार आहे.
हिंदवी स्वराज्याचे बांधकाम प्रमुख व छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू मावळे सरदार हिरोजी इंदुलकर यांचे तेरावे वंशज संतोष सुभाष इंदुलकर दौंड मध्ये सहभागी होणार आहेत होणार आहेत. सोमवार दी.२३ रोजी इंदुलकर यांचे वंशज सहभागी होणार असून मार्गदर्शन करणार आहेत.
आणि दौडीच्या शेवटच्या दिवशी सांगता समरोपला पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे.