घटप्रभेच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हिडकल जलाशयात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे, बुधवारी संध्याकाळी जलाशयाचे दहा दरवाजे उघडण्यात आले. आणि धरण रंगीबेरंगी दिव्यांनी प्रकाशित करण्यात आले रात्री पासून घटप्रभा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात असून घटप्रभा आणि हिरण्यकेशी नदीच्या काठावरील सर्व गावांतील ग्रामस्थांना त्यांच्या जनावरांसह सुरक्षितस्थळी हलविण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावला आहे.हिडकल जलाशय ८४.७५ टक्के भरले असून जलाशयात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.