गजाननराव भातकांडे इंग्लीश मिडियम स्कूल व रोटरी क्लब नाँर्थ बेलगाम रविवारी आयोजित केलेल्या “गणेश” विषयावरील खुल्या बालचित्रकला स्पर्धेस चांगला प्रतिसाद लाभला. गजाननराव भातकांडे शाळा या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यात, तब्बल १००० हजार ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये बेळगाव शहरातील तब्बल ६५ शाळेनी भाग घेतलाहोता.
गजाननराव भातकांडे शाळा दरवर्षी कलाविषयक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेचे उद्घाटन समांरभाला रोटरी क्लबचे इवेंट चेअरमन रोटेरियन इर्फान शेखाली अध्यक्ष रोटेरियन उमेश गोरबाल सेक्रेटरी रोटेरियन जितेंद्र बामने रोटेरियन मुकुंद महांगावकर रोटेरियन महांतेश पुराणिक भातकांडे शाळेचे चेअरमन मिलिंद भातकांडे शाळेच्या प्राचार्या प्रेमलता पाटील ज्योती मुंचडी व शामल पाटिल उपस्थित होते.
चित्रकला स्पर्धा रविवारी सकाळी १० ते १२.३० या वेळेत आयोजित केली होती. त्यात १०४२ हजार विद्यार्थ्यांनी ‘गणेश’ या विषयावर वैविध्यपूर्ण चित्रे रेखाटली. लालबागचा राजा, बाल गणेश, दगडुशेठ हलवाई, चिंतामणी, सिद्धिविनाय असे विविध प्रकारचे गणेशाचे चित्र विद्द्यार्थ्यानी उत्कृष्ट पध्द्तीने काढलेत. या स्पर्धेत उत्कृष्ट चित्रे रेखाटणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धेचे यंदाचे २०वे वर्ष असूनही स्पर्धा एल केजी व युकेजी ग्रुप ए गट पहिली ते दुसरीतील विद्यार्थ्यांचा ग्रुप बी गट, तिसरी ते चौथी विद्यार्थ्यांचा ग्रुप सी गट, पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांचा ग्रुप डि गट, आठवी ते दहावीतील ग्रुप इ अकरावी ते बारावी ग्रुप एफ असे ५ गट होते. प्रत्येक गटाला उत्कृष्ट पारितोषिके आहेत. या स्पर्धेतील पुरस्कार विजेत्यांची घोषणा १८ सप्टेंबरला केली जाणार.हि स्पर्धा यशस्वी करण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षकानी विशेष परिश्रम घेतले.