भारतीय जनता पार्टी बेळगाव महानगर जिल्हा कार्यालयात संविधान शिल्पकार, भारतरत्न डॉ. बी. आर.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे महापरिनिर्वाण दिनी पूजन करण्यात आले.
यावेळी बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, बेळगाव भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष अनिल बेनके, ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, प्रदेश भाजपा प्रवक्ते एम.बी.जिराली भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष मंजुनाथ पंमार व भाजप महानगर व उत्तर मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.