बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनेची मासिक सभा ३ डिसेंबर रोजी संघटनेच्या कार्यालयात उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन सुभेदार के. बी. नौकुडकर होते. उपाध्यक्ष नारायण पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर शहीद जवानांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
मासिक अहवाल गंगाराम गवस यांनी सादर केला. संघटनेचे सदस्यत्व स्वीकारलेल्या सदस्यांचे स्वागत करण्यात आले. सुभेदार नौकुडकर यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला.
संघटना कार्यालयात ईसीएचएस कार्डचे नूतनीकरण, नवीन कार्ड बनविणे, आई, बडील व १८ वर्षांवरील मुलांचे टीडीएस काढणे व अपलोड करणे, स्पर्श पीपीओ व पेन्शन स्लीप काढणे अशी कामे केली जात असून त्याचा माजी सैनिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी महासचिव सुभेदार पांडुरंग पाटील, उपाध्यक्षा छाया शिंदे, संचालक हिराबाई भेंडवाडे, सौपीओ अशोक पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते. गंगाराम गवस यांनी आभार मानले.