पिके कॉटर्स खासबाग येथील सफाई कर्मचारी कवळु समितीच्या सदस्यांनी आज महानगरपालिकेसमोर आंदोलन केले आणि येथील नगरसेवक रवी धोत्रे यांच्याविरुद्ध तक्रार केली.
पि के कॉटर्स येथे मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. शहराची स्वच्छता करणाऱ्या कामगारांच्या परिसरात सुविधा नसल्याने येथील रहिवाशांची डोकेदुखी वाढली आहे.
गटारी ड्रेनेज रस्ता त्याचबरोबर सरकारी शौचालय ला दरवाजे नसल्याने नागरिकांना या भागामध्ये राहणे मुश्किल बनले आहे.
त्यामुळे नगरसेवक कोणती सुविधा पुरवत नसल्याचा आरोप आज पिके कॉटर्स येथील नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंडी यांच्याजवळ केला आणि आपल्याला भागात लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.