बेळगावात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या कर्नाटक सरकारचा विद्यार्थ्यांनी व्यक्त केला काँग्रेसच्या गॅरंटी योजनेचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना बसमधून धोकादाय प्रवास करावा लागत असून कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी विद्यार्थ्यांकरिता जादा बसेस सोडाव्यात या मागणी करिता विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांनी शहरात निषेधात्मक रॅली काढली आणि त्यांना सर्कल येथे घेराव घातला. त्यानंतर त्यांना सर्कल येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यावेळी जिल्हाधिकारी येईपर्यंत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठाण मांडून जादा बसेस सोडाव्यात अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी दिला.