बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एका तरुणांने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. जंतुनाशक औषध पिऊन त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केलाय. गोकाक तालुक्यातील लंगमेश्वर गावातील कुमार कल्लाप्पा कोपड 32 असे आत्महत्याचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत जंतुनाशक प्यालेल्या कुमारला जिल्हा रुग्णालयात पाठविले. आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तरुणाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही मात्र जंतुनाशक औषध प्यायला ने तो अस्वस्थ झाला अशी माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे.