बेळगाव – गेली ६५ वर्ष संयुक्त महाराष्ट्रात समावेश होण्यासाठी मराठी भाषिक सीमाभागातील मराठी भाषिक
संघर्ष करीत आहेत याच संघर्षाचा इतिहास अखंड महाराष्ट्राचा लढा
गीता मधून १८ फेब्रुवारी ला
रसिकांच्या भेटीला येत आहे, सीमाकवी म्हणून प्रसिध्द असलेले रवींद्र पाटील यांनी हे लिहिले असून सुप्रसिध्द संगीतकार शरद गोरे यांनी संगीतबध्द केले आहे तर सुप्रसिध्द गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी हे गीत गायले आहे,
नुकतेच या गाण्याचे ध्वनीमुद्रण पुणे येथे पार पडले ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहिर अमर शेख यांचा प्रबोधनाचा वारसा सांगणारं हे गीत असून ते मराठी भाषिकांच्या ह्रदयावर नक्कीच अधिराज्य गाजवेल अशी आशा आहे ,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १८ फेब्रुवारी रोजी मराठा मंदिर बेळगाव या ठिकाणी संपन्न होणार्या ५ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनात या ऐतिहासिक गीताचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे ,मोठया प्रधीर्ग कालखंडानंतर अशा आशयाचे गीत मराठी भाषिकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे सर्वांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे .