No menu items!
Friday, August 29, 2025

*अखिल भारतीय 5 वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन : निमंत्रण पत्रिकेचे अनावरण

Must read

माय मराठीचा जागर यशस्वी करूया; गावोगावी जागृती करावी : महादेव चौगुले

मराठी भाषा आणि संस्कृती जतन करण्याची आज गरज : आप्पासाहेब गुरव

जबाबदारीथून कार्य करण्याची तयारी प्रत्येकाने करायला हवी : माजी नगरसेवक नेताजी जाधव

कोणतेही कार्य यशस्वी करण्यासाठी प्रत्येकांचे सहकार्य महत्वाचे आहे : मराठी संवर्धन करण्यासाठी पुढे यायला हवे : अप्पासाहेब गुरव

माय मराठीचा जागर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे : नागेश झुंगरूचे

जेष्ठ साहित्यिक कृष्णात खोत संमेलनाध्यक्षपद भूषविणार*


बेळगाव (प्रतिनिधी ) रविवार दि .11 फेब्रुवारी 2024 :

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित ‘ ५वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन -2024 ‘ रविवार दि .18 फेब्रुवरी 2024 रोजी मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी निमंत्रण पत्रिकेचे अनावरण कार्यक्रम सोहळा मराठा मंदिर मध्ये रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव चौगुले उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव , माजी नगरसेवक अनिल पाटील व नेताजी जाधव, नागेश झंगरूचे, नागेश तरळे, उपाध्यक्ष नेमिनाथ कंग्राळकर, राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, परिषदचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण , महिला जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे – पाटील , परिषदेचे उपाध्यक्ष डी. बी. पाटील, प्रा. निलेश शिंदे, संजय मोरे , सूरज कणबरकर व्यासपीठावर उपस्थित होते ; सर्व मान्यवरांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या आमंत्रण पत्रिकांचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवरांनी भाषणे केली.

स्वागत संजय गुरव यांनी केले.
प्रास्ताविक परिषदचे राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी संमेलन भरविण्याचा उद्देश स्पष्ट केला.

यावेळी एम. वाय. घाडी, अड. सौरवसिंह पाटील, स्मिता चिंचणीकर, गीता घाडी, प्रा.मनिषा नाडगौडा, डॉ. संजीवनी खंडागळे, रोशणी हुंदरे, नेत्रा मेणसे, स्मिता किल्लेकर यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी विद्यार्थी पालक शिक्षक हितचिंतक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी

बेळगांव : निमंत्रण पत्रिका चे अनावरण करताना अप्पासाहेब गुरव , नागेश झुंगरूचे, नेताजी जाधव, अनिल पाटील, नेमिनाथ कांग्राळकर, नागेश तरळे डी. बी.पाटील, सुधिर चव्हाण, रवी पाटील, प्रा निलेश शिंदे, अरुणा गोजेपाटील, सूरज कणबरकर आणि इतर.


कार्यक्रमाचे स्वरूप

यावेळी ५ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक कृष्णात खोत भूषविणार आहेत . त्यांना सन् 2023 चा साहित्य अकादामीचा पुरस्कार मिळाला आहे . संमेलनाचे स्वागताध्यक्ष
म्हणून शिवसंत संजय मोरे असणार आहेत.

सदरहू हे संमेत्रन तिन सत्रांत होणार आहे . गोवावेस येथून ग्रंथदिंडी सुरुवात होईल . संमेलनाच्या उद्घाटन सत्रात डॉ सदानंद मोरे यांनी संपादित व दीर्घ प्रस्तावना असलेल्या ‘ शिवराजाभिषेक : भारतातील इतिहासातील असामान्य घटना ‘या पुस्तकाचे प्रकाशन

तसेच गीताकर सीमाकवी रवींद्र पाटील आणि शरद गोरे यांनी संगीतबद्ध असलेले सुप्रसिद्ध पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी स्वरबद्ध केलेले गीत ‘अखंड महाराष्ट्राचा लढा ‘ या ध्वनिमुद्रीत गीताचा प्रकाशन सोहळा संपन्न होईल .

पहिल्या सत्रांत – अध्यक्षीय भाषण , दुसरे सत्र – व्याख्यान शिवराज्याभिषेक : भारताच्या इतिहासातील असामान्य घटना ‘ या विषयावर व्याख्याते -प्रा. गणेश राऊत यांचे व्याख्यान
आणि तिसऱ्या सत्रात – कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ प्रस्तूत ‘ महाराष्ट्राची लोकधारा ‘ हा लोककलेतून प्रबोधन व मनोरंजन ‘ असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे . अशी माहिती राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली .

सदर साहित्य संमेलन लोकवर्गणी होत असून दरवर्षी सढळ हस्ते देणगी देणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सत्र संपन्न होणार आहे . संमेलन यशस्वी करण्याकरीता परिषदेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत .

यावेळी सूत्रसंचालन एम. के. पाटील यांनी केले. आभार एल.पी.पाटील यांनी मानले.


- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!