बेळगाव, प्रतिनिधी
खुला आसमान’तर्फे शनिवार दि.२४
फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता, ‘ओ गानेवली’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कोनवाळ गल्लीतील ‘रिझ थिएटर’मध्ये हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून गौहर जान, जानकीबाई, रासूलन बाई, बेगम अख्तर, ठुमरी क्वीन शोभा गुर्टू यांनी अजरामर केलेल्या काही रचना आणि त्यांच्याच आयुष्यातले काही किस्से आणि घटना अवंती पटेल आणि ऋतुजा लाड उलगडून दाखवणार आहेत.
अवंती पटेल यांच्या संकल्पनेतून
आणि अभ्यासातून तयार झालेला हा
कार्यक्रम आखण्यात आला आहे.
‘ओ गानेवली’ हा कार्यक्रम मूळच्या
बेळगावच्या असणाऱ्या ठुमरी क्वीन शोभा गुर्टू यांना स्मरून खास कार्यक्रम सादर
केला जाणार आहे. साधारण ९० मिनिटे
चालणारा, हिंदी आणि ऊर्दू भाषेतील
किस्से आणि गोष्टी सांगत हा प्रवास
दाखविला जाणार आहे. तरुणांमध्ये कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि प्रेक्षकांची नवीन पिढी तयार करण्यास हातभार लावणे, हे उद्दिष्ट ठेवून २०१६ मध्ये खुला आसमान’ची सुरुवात करण्यात आली.नृत्य, संगीत आणि नाट्यक्षेत्रातील
नामवंत व्यक्तींच्या कार्यशाळा आणि
प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले
आहे. गेल्या काही वर्षांत पद्मश्री सतीश
आळेकर, शमा भाटे, संजीव सुवर्णा,
पार्श्वनाथ उपाध्ये आणि शकुंतला
नगरकर यांसारख्या नामवंत कलाकारांचे
कार्यक्रम केले आहेत.