No menu items!
Thursday, March 13, 2025

ते अतिक्रमण त्वरित हटवा चन्नेवाडी ग्रामस्थांची मागणी

Must read

चन्नेवाडी ता.खानापूर येथील ग्रामस्थांनी दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी कसबा नंदगड ग्राम पंचयातीचे विकास अधिकारी (पीडिओ) व अध्यक्ष यांचेकडे एका शौचालयाचे अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनात गावकऱ्यांनी असे म्हटले आहे की, श्री.मल्लाप्पा नारायण पाटील व श्री.वसंत निंगाप्पा पाटील यांच्या दोन्ही घरांच्या मोकळ्या जागेतून पूर्वीपासून सार्वजनिक रस्ता आहे, पण या सार्वजनिक रस्त्यावर श्रीमती शीला राजू पाटील या अनधिकृतरित्या शौचालयाचे बांधकाम करत आहेत,सार्वजनिक जागेतील ते अनधिकृत बांधकाम ग्रामपंचायतीने त्वरित हटवावे, अध्यक्ष, सदस्य व अधिकाऱ्यांनी सदर जागेची पाहणी करून शिडीवर्क करून दुतर्फा गटारीचे काम करावे, तसेच गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंप गेले महिनाभरापासून बंद अवस्थेत असल्याने पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे, त्याचीही तक्रार अनेकदा करून सुद्दा ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केलेले आहे, लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन समस्या निवारण करावे,अन्यथा ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत, तसेच ही जागा देवस्कीची असून त्या जागेवर एक भले मोठे आंब्याचे झाड होते,त्याला लक्ष्मी आंबा असे संबोधले जात होते,या निवेदनानंतर गावकऱ्यांनी गावबैठक घेऊन सदर श्रीमती शिला राजू पाटील व त्यांचा मुलगा कुमार मंथन यांस अनधिकृत बांधकामविषयी समंजसपणे माहिती दिली व ते बांधकाम बांधकाम स्थगित करण्यास सांगितले व त्या प्रमाणे मंथन यांने गावकऱ्यांच्या समोर सहिनीशी बांधकाम स्थगित ठेवणार असणार असल्याचे लिहून दिले, असता त्यांनी गावकऱ्यासमोर अरेरावीची भाषा करत रोजगाराच्या नावाने गावातील रोजगाराला जाणाऱ्या मंडळींना वेठीस धरण्याचा प्रयत्न चालविला आहे, यासाठी गावकरी नजीकच्या काळात जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन तक्रार मांडणार आहेत.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!