गणाचारी गल्लीत समुदाय भवन उभे करावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. मात्र, त्या विरोधात खाटिक समाजाने मनपा व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले व सदर जागा खाटिक समाजासाठी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे याठिकाणी या गोष्टीवर तोडगा काढण्यासाठी जमलेल्या नागरिकांमध्ये वाद चिघळला आहे आणि दगडफेक झाली .
मंगळवारी रात्री हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही गटांतील प्रमुख मंडळींना खडे बाजार पोलिस स्थानकात बोलावण्यात आले होते. गणाचारी गल्लीतील नागरिकांनी पोलिस स्थानकासमोरच आंदोलन सुरू केले. यातून वादावादी सुरू झाली. त्यानंतर दगडफेकही झाली. त्यात तिघे जखमी झाले आहेत. राजू तळवार, सुरेश लाठे आणि एक अल्पवयीन युवक जखमी झाला आहे
बकरी मंडईचा वाद चिघळा असल्याने दगडफेक होऊन हाणामारी
