No menu items!
Saturday, May 31, 2025

मारुतीकारची टिळकवाडीतून चोरी

Must read

बेळगाव शहर व तालुक्यात वाहने चोरीचे प्रकार सुरूच आहेत. शिवाजी कॉलनी, टिळकवाडी येथे घरासमोर उभी करण्यात आलेली कार चोरण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली असून टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
शिवाजी कॉलनी, टिळकवाडी येथील अभिषेक नागेश बांदिवडेकर यांनी गुरुवारी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. बुधवार दि. ३० एप्रिल रोजी रात्री केए २५ एमसी ७३६२ क्रमांकाची मारुती सुझुकी ईको कंपनीची कार त्यांनी आपल्या घरासमोर उभी केली होती. मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास पाहिले असता कारची चोरी झाल्याचे उघडकीस आले. कारची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये इतकी आहे. टिळकवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!