अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्या प्रकरणी आतापर्यंत तीन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. ज्या फार्महाऊसमध्ये ही घटना घडली त्या फार्महाऊसच्या चालकांनाही पोलिसांनी अटक केली आहे. सावगाव रोडवरील एका फार्महाऊसवर पंधरा दिवसांपूर्वी एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला बियर पाजवून दोघा जणांनी तिच्यावर अत्याचार केला होता. यावेळी आणखी एक अल्पवयीन मुलगाही होता. त्या मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी या प्रकरणाची चौकशी आता मार्केट पोलिसांकडे सोपविली आहे. मार्केट पोलिसांनी रोहन पाटील (वय २२), आशुतोष पाटील (वय २४) या दोघा जणांना अटक केली आहे. एक फार्महाऊस लिजने घेऊन हे दोघे चालवतात, अशी माहिती मिळाली आहे. अल्पवयीन मुलांना फार्महाऊस उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. फार्महाऊस कोणी बुक केले, पंधरा दिवसांपूर्वी नेमके काय घडले? याची संपूर्ण माहिती मिळविण्यात येत आहे