प्यास फाऊंडेशन तर्फे टीचर कॉलनी खासबाग येथे पुनर्जीवित करण्यात आलेल्या विहीरीच्या बाजूला झाडे लावून पर्यावरण वाचविण्यासाठी सुरुवात करण्यात आली यावेळी प्यास फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ माधव प्रभू यांनी पर्यावरण वाचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत यासाठी सर्वांनी अधिक झाडे लावावी असे आवाहन केले यावेळी प्यास फाऊंडेशन च्या सेक्रेटरी डॉ प्रीती कोरे, अभिमन्यू दागा, लक्ष्मीकांत पसारी सतीश लाड, अवधूत सामंत, रोहन कुलकर्णी, दीपक ओउळकर, सुर्यकांत हिंडलगेकर हे सर्वजण उपस्थित होते त्याचवेळी टीचर कॉलनी, श्रींगारी कॉलनी, बाडीवाले कॉलनी येथील महिलांनी या उपक्रमाचे कौतुक करून येथे लावण्यात आलेल्या झाडांची निगा राखून झाडे वाचविण्याची जबाबदारी घेतली वॉर्ड क्रमांक 21 च्या नगरसेविका सौ प्रिती विनायक कामकर यांच्या शुभ हस्ते झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला यावेळी सौ शिल्पा हितलकेरी, सौ माधवी हिंडलगेकर, सौ अश्विनी इंगळे, सौ ज्योती पाटील, सौ स्मिता अंनघोळकर, सौ गीता भस्मे, सौ अर्चना हंनगोजी,सौ पाटणकर सौ पाटील,सौ हडिगनाळ, आणि इतर मान्यवर उपस्थित होते
प्यास फाऊंडेशन तर्फे झाडे लावून पर्यावरण वाचविण्यासाठीच्या उपक्रमला केली सुरुवात
By Akshata Naik

Next articleबेळगावात गर्भवती महिलेला कोरोना संसर्ग