नारी तु कभी ना हारी बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे आतंरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला गेली 18 वर्षे विविध शेत्रातील कष्टाळू व सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार असो तर्फे करण्यात येतो यावेळी पूर्वी खानापूर व सध्या बेळगांव येथील सीता वसंत निर्मळे यांचा सत्कार करण्यात आला व उपस्थित सर्व महिलांना चॉकलेट चे वाटप करून महिला दिवस साजरा करण्यात आला
सीता निर्मळे ह्या जुन्या काळातील फोटोग्राफर असून गेली 32 वर्षे त्यांना खानापूर सारख्या दुर्गम भागात ही सेवा त्यांनी सुरू केली त्या काळी फोटो काढल्यानंतर फिल्म प्रिंट काढण्यासाठी बेळगांव शहरामध्ये यावे लागत होते आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी ही सेवा संपुर्ण खानापूर तालुक्यात दिली त्या काळात जत्रेत, समारंभ व सरकारी व ईतर कामांसाठी लागणारे सर्व फोटो काढणे व प्रिंट करून सर्वांना देणे ही जबाबदारी ची कामगिरी त्या काळात त्या पार करत , कुटूंबाची सर्व जबाबदारी त्यांचा वर असताना त्यांनी कधी ही सेवा बंद केली नाही आपल्या सर्व मुलींची शिक्षण पूर्ण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले त्या सर्वांची लग्ने लावुन त्यां सर्वांचा संसार सुख समाधानाने करून दिला सध्या त्या 72 वर्षाच्या असून ह्या वयात सुद्धा त्या लहान मुलासाठी लोकरीचे स्वेटर, पाय मोजे, गुंनच, धोपटी, टोपडी, अश्या आणि ईतर गोष्टी करून देत त्यांनी आपला जीवनक्रम सुरळीत ठेवला आहे अशा या महिलेचा सत्कार मोठ्या प्रमाणात करण्यात आला हा सत्कार समाजसेविका भक्ती शिंदे यांनी त्यांना शाल ,बुके व सन्मान चिन्ह देऊन सीता वसंत निर्मळे यांना सन्मानाने गौरविण्यात आले हा कार्यक्रम गोवावेस स्केटिंग रिंकवर झाला यावेळी वसंत निर्मळे, गणेश दड्डीकर, स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर,
ऋषीकेश पसारे, बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स, पालक व इतर मान्यवर उपस्थित होते
बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे महिला दिवस साजरा खानापूर मधील प्रसिध्द महिला फोटोग्राफर सीता वसंत निर्मळे यांचा सत्कार
