महिलांसाठी सांस्कृतिक सामाजिक आणि साहित्यिक उपक्रम राबवणाऱ्या बेळगावच्या तारांगण मार्फत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . नारीशक्ती महिला मंडळ व श्री ऑर्थो व ट्रामा केअर यांच्या सहकार्याने उद्नांक 3 मार्च रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेमध्ये वडगाव रणझुंजार कॉलनी येथील गणेश मंदिर मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.या शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, हाडांची तपासणी केली गेली . तपासणी सोबतच सल्ला व मार्गदर्शन ही रुग्णांना केले सदरचा शिबिराचा लाभ वडगाव परिसरातील नागरिकांनी घेतला.
तारांगण तर्फे मोफत आरोग्य शिबिर संपन्न
By Akshata Naik
Previous articleलोकसभा निवडणुकीकरिता शेतकरी उमेदवार द्या –
Next articleपै अतुल शिरोळे यांचा मराठा मंडळ कडून सत्कार