भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उद्या बेळगाव ला येणार आहेत. या पार्श्व्वभूमीवर राष्ट्रीय शेतकरी संघाचे पदाधिकारी आणि सदस्य भेट घेऊन मागणी करणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कार्यकर्त्यांसाठी लोकसभा निवडणुकीचा उमेदवार बनवण्याची मागणी मागणी आज पत्रकार परिषदेत प्रकाश नाईक यांनी केली
जर भाजप ने लोकसभा निवडणुकी करिता शेतकरी उमेदवार दिला तर शेतकऱ्यांची कर्जे माफ होतील आणि शेतकऱ्यांच्या श्रमाला आर्थिक सुरक्षेचा दर्जा मिळेल आणि शेती सुधारेल तसेच शेतकऱ्यांचे जीवन आनंदी होईल .
आणि सशक्त राष्ट्र निर्माण होण्यास मदत होईल.अशी मागणी शेतकरी उद्या राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे निवेदनाद्वारे करणार असल्याचे सांगितले .