बेळगांव येथील पै.अतुल सुरेश शिरोले यांनी भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात येणारा कोचिंग कोर्स पूर्ण केला असून त्यांना ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. त्यामुळे पैलवान म्हणून कुस्तीचे मैदान गाजवणारे अतुल शिरोले आता कुस्ती प्रशिक्षक म्हणून मैदानावर उतरणार आहेत.
पंजाबमधील पटियाला येथे नेताजी सुभाष चंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टमध्ये कुस्ती प्रशिक्षक पदासाठी डिप्लोमा कोर्स करण्यासाठी देशभरातील विविध भागांतून पैलवान उपस्थित होते.
हा त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे त्याचप्रमाणे अतुलच्या कार्याची दखल घेऊन मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर राजश्री नागराजू हलगेकर यांनी अतुलचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
याप्रसंगी मराठा मंडळ संस्थेचे सर्व कर्मचारी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.