बेळगाव : आज सोमवार दि. १७ जून रोजी होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व तालुक्यात रविवारी सायंकाळपासूनच मद्यविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त व अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यडा मोटिन मार्बन्यांग यांनी हा आदेश बजावला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रविवार दि. १६ जूनच्या सायंकाळी ६ पासून मंगळवार दि. १८ जूनच्या सकाळी ६ पर्यंत वाईनशॉप, बार, क्लबमध्ये दारूविक्री बंदीचा आदेश असणार आहे. दारू दुकानांबरोबरच केएसबीसीएल डेपो, हॉटेल, बारही बंद करण्याचा आदेश बजावण्यात आला असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंदी
By Akshata Naik
Previous articleचलवेनहट्टी येथे बटाटा लावणी जोमात
Next articleशहापूर येथील ९ जणांना जामीन