बेळगाव : लहान मुले क्रिकेट खेळताना
वादावादी झाल्यामुळे शहापूर अळवण गल्ली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. २३ मे २०२४ रोजी ही घटना घडली. त्यानंतर परस्परांविरोधात फिर्याद दाखल झाली. याप्रकरणी तिघांना अटक झाली होती. त्यांना व इतर सहा जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सल्लाउद्दीन खतालसाब तोरगल, इब्राहीम अजुमुद्दीन तोरगल, मेहबुब खतालसाब तोरगल (रा. अळवाण गल्ली- शहापूर) या तिघांना अटक झाली होती. त्यांना सहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. तर रफीक खतालसाब तोरगल, फैरोज अजुमुद्दीन तोरगल, सोहेल शोकत कडबीवाले, तन्वीर रफीक तोरगल, मुजीबसलाम उर्फ मुजीब कासीमसाब तोरगल, तौहीद मुजीबसाब तोरगल या सर्वांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.