आपल्या तीन मुलांना सोडून 40वर्षीय महिला 25 वर्षाच्या युवका बरोबर पळून गेल्याची घटना गणेशपुर बेळगाव येथे उघडकीस आली आहे. सरकारी नोकरीत असणारा नवरा वारल्या नंतर त्याची नोकरी मिळवली पुढे काही दिवस ती मुलांसोबत भाडोत्री घरात राहत होती. गेल्या काही महिन्यांपासून गणेश पुर भागातील या महिलेचे विनायक कोलकर नावाच्या युवकाशी सुत जुळले आणि आपल्या तीन मुलांना सोडून त्या युवकाबरोबर पळून गेल्याने तिन्ही मुले वाऱ्यावर आली. आता तिन्ही मुले न्याय मागण्यासाठी कॅम्प पोलीस स्थानकात पोहचली. आईने त्या युवकाला सोडून आपल्या सोबत राहावे अशी त्या मुलांनी विनवणी केली तरी त्या महिलेने नकार दिला. सध्या तिन्ही मुले आपल्या आजी सोबत आहेत.
40 वर्षीय महिला गेली 25 वर्षाच्या तरुणासोबत
By Akshata Naik
Previous articleशहापूर येथील ९ जणांना जामीन