बेळगाव येथिल एक्वा डॉल्फिन ग्रुप चे अध्यक्ष श्री सुहास निंबाळकर वय वर्ष 72 हे आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्त जलयोगा करणार आहेत बेळगाव महानगरपालिका जलतरण पुल गोवा वेस येथे 21 तारखेला सकाळी 8 वाजता हा कार्यक्रम होणार असून श्री निंबाळकर हे जलयोगा चे वेग वेगळे प्रकार करून आंतरराष्ट्रीय योगा दिवासचे महत्त्व पटवून देणार आहेत या जलयोगा साठी अक्वा डॉल्फिन ग्रुप चे सदस्य हे या कार्यक्रम मध्ये सहकार्य करणार असून आबा स्पोर्ट्स क्लब च्या मार्गदर्शन खाली हा जलयोगा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून या कार्यक्रम साठी उपस्थित राहून श्री सुहास निंबाळकर यांचा जलयोगा कार्यक्रम यशस्वी करावा ही आयोजका तर्फे विनंती करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्त सुहास निंबाळकर यांचे जलयोगा.
By Akshata Naik
Previous article40 वर्षीय महिला गेली 25 वर्षाच्या तरुणासोबत