चलवेनहट्टी येथील नवरात्र उत्सव मंडळची बैठक हल्लाप्पा आलगोंडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली या बैठकीत नुतन कार्यकारणीची निवड करण्या बाबात चर्चा करण्यात आली यावर्षी घटस्थापना
तीन ऑक्टोबर पासून आहे येणाऱ्या उत्सवा पुर्वी नुतन कार्यकारिणीच्या निवड करणे अपेक्षित होते.त्यामुळे सर्वानुमते अध्यक्षपदी पुंडलिक पाटील यांची निवड करण्यात आली आहे.तर उपाध्यक्षपदी परशराम हुंदरे यांची निवड करण्यात आली
सचिव पदासाठी इंद्रजित कलखांबकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
खजिनदार पदासाठी निलेश पाटील तर उपखजिनदार पदासाठी राजू पाटील यांची निवड करण्यात आली.
हिशोब तपासणीस पदासाठी मनोहर हुंदरे,गजानना कलखांबकर,युवराज आनंद पाटील,मारुती कलखांबकर यांची निवड करण्यात आली आहे . यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मावळते अध्यक्ष यांचे विषेश कौतुक करताना त्यांनी आपल्या कार्यकाळात मोठ्या उत्साहात उत्सव पार पाडत आपली कामगिरी चोख पार पाडली असे म्हणत कौतुक केले दोन वर्षाच्या कालावधीत नवरात्र उत्सवात समजा प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यावर भर देणार आहोत तसेच मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करणार असल्याची घोषणा केली आहे.तर मावळते अध्यक्ष हल्लाप्पा आलगोंडी यांनी निवनिर्वाचित अध्यक्ष तसेच पदाधिकारीचे अभिनंदन केले यावेळी चाळोबा पाटील,सचिन कितवाडकर, मलू अशोक पाटील, अभय पाटील, निलेश सनदी, बाबू मारुती सनदी, संतोष पाटील, युवराज मल्लाप्पा पाटील मल्लाप्पा कलखांबकर देवाप्पा पाटील आदी उपस्थित होते