बेळगाव : घुमटमाळ, हिंदवाडीयेथील एका युवकाने खादरवाडी, ता. बेळगाव येथील तलावात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. शनिवारी गणेशोत्सवाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विशाल आनंद भट (वय ३०) रा. घुमटमाळ, हिंदवाडी असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. शनिवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वा. तो केए २२ एचई ६४९९ क्रमांकाची आपली मोटरसायकल घेऊन घराबाहेर पडला होता. नंतर तो घरी परतला नाही. रविवारी सकाळी खादरवाडी येथील तलावात त्याचा मृतदेह आढळून आला असून त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. विशालचा भाऊ सचिन भट याने दिलेल्या फिर्यादीवरून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला असून ळी पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ पुढील तपास करीत आहेत