भीम भक्त आणि शिवभक्त यांच्या आंदोलनास यश
शिवभक्त आणि भीम भक्त च्या मागण्या झाल्या पूर्ण
बेळगाव रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प बसविण्यास टाळाटाळ करण्यात येत होती मात्र आज अखेर रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकाच्या आत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शिल्पे बसविण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे शिवभक्त आणि भिमभक्त यांच्या आंदोलनास अखेर यश आलं आहे.गेल्या दोन-तीन वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प बसवावे अशी मागणी करण्यात येत होती तसेच अनेक वेळा आंदोलनही करण्यात आले होते अखेर प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत आज शिल्प बसविले. यावेळी शिवभक्त आणि भीम भक्तांनी शिल्प बसविल्यावर रेल्वे स्थानकासमोर एकच जल्लोष केला.