No menu items!
Sunday, December 22, 2024

वाल्याचा वाल्मिकी-माझा मित्र बाळू पाटील (शिंधुर बाळू). यास भवपूर्ण श्रद्धांजली ।त्याला गुडबाय म्हणताना मला त्याचा भूतकाळ आठवला ज्याच्या आधारे मी त्याला वाल्याचा वाल्मिकी म्हणू इच्छितो. हा एक योगयोग वाल्मिकी जयंतीच्या आठवड्यात अल्पशा आजाराणे अचानक त्यांचे निधन झाले.

Must read

 एकेकाळी लोक त्याच्या कपाळावरचा  टिळा (शिंधुर)बघून ओळखायचे. बेळगाव ते शिनोली- नागनवाडी-चंदगड- खानापूर- गोवा भागात ख्याती असलेला.  व राजकीय लोक, हिंदू संघटना, आदरणीय ग्रामस्थ, पोलीस विभाग यांच्या कायम संपर्कात होता. 

सुमारे 30 वर्षांपूर्वी, तो हिंदू संघटनेसाठी काम करत होता, त्यावेळी तो गुंडांच्या संपर्कात आला. त्या वेळी बेळगावमध्ये हिंदू-मुस्लिम यांच्यात खूप संघर्ष व्हायचा. विशेषत: दरवर्षी गणेश चतुर्थीच्या वेळी. हे तरुण त्यांच्याविरुद्ध लढत् आसत. त्या वेळी कुविख्यात सुपरि-किल्लर कडूंन त्यांच्यI मुखय्या चा खून होतो.
त्यावेळी तो वर्षभर तुरुंगात सुधा होता. ती परिवर्तनाची वेळ!
त्यानंतर काही कसे आपला संसार थाटला. त्यlला आपल्या कर्माची जाणिव झाली. तेव्हापासुन कधिच मागे वळून पाहिले नाही. स्वताला समाज कार्यात झोकून दिले. गावा गल्लीमधे कोनी आजरी असो वा अडचनीत असो कायम मदत करात असे, रात्री अपरात्री कोणीही बोलावले असता लागेच उठून जात असे.
राजकरण-निवडणुकीच्या वेळी अहोरात्र प्रचार, सुरुवातीचे कlलात समिती व आता राष्ट्रीय पक्ष कार्यात सक्रिय होता. त्याचबरोबर हिंदू संघटना, श्रीराम सेना असो बजरंग दल असो एक कार्यकर्ता म्हनुन कायम उपस्थीत असे.

कोविड योद्धा- कोविड महामारीच्या काळात त्यांनी अनेकांना घरोघरी मदत केली. अन्न आणि भाजीपाला पुरवठा, जीवन संघर्ष फाउंडेशन रुग्णवाहिका सेवा, ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मध्ये कोविड महामारीच्या काळात त्यांनी अनेकांना घरोघरी मदत केली. अन्न आणि भाजीपाला पुरवठा, जीवन संघर्ष फाउंडेशन रुग्णवाहिका सेवा, ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मध्ये (Isolation centre) एक स्वयंसेवक म्हणून काम केले.

ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुळगे(उ) गावचा विकास, स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा. रस्त्यांचे काम, गटारी आणि स्वच्छता. या सर्व कामात कोणताही भेदभाव केला नाही.

अध्यात्माची आवाड – गावमधिल वारकरी संप्रदायाचे कार्य असो वा मंदिराचे काम आगदी भक्तिभावाने कार्यात असे.

अशे हरहुन्नरी व्यक्तिमत्व होने नाही. लिहावे तेवडे कमीच.
त्याला शेवटचा निरोप देताना खूप वाईट वाटतं.
मरावे परी कीर्ती रूपी उरावे । वरिल कार्यमधुंन स्वताला वाल्याचा वाल्मिकी सिद्ध करुण दाखविले!

जीवन संघर्ष प्रतिष्ठान कडून स्व. बाळू पाटील याना भावपूर्ण श्रद्धांजली.

                      शब्दांकन- डॉ गणपत पाटील 
                                     संस्थापक 
                                     जीवन संघर्ष प्रतिष्ठान
- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!