जिल्ह्यात विविध ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांत विविध कारणांमुळे रिक्त असलेल्या जागांवर २३ नोव्हेंबररोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आचारसंहितेचे पालन करण्यासाठी २१ पासून २३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावला आहे.
जिल्ह्यात ४८ ग्रामपंचायतींत तसेच संकेश्वर नगरपालिका, निपाणी नगरपालिका आणि नागनूर नगरपंचायतीतील रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे २१ नोव्हेंबररोजी सायंकाळी ५ ते २३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. संबंधित भागात ही मद्यविक्री बंद असणार आहे. तर या काळात गावात कोणतीही यात्रा आणि बाजारही भरवला जाणार नाही, असाही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे