बेळगाव : मीरापूर गल्ली, शहापूर येथील गंगाधर ग्रामोपाध्ये यांच्यचिदंबर मंदिरातर्फे गुरुवार दि. २१ रोजी दुपारी १२ वाजता चिदंबर जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त बुधवार दि. २० रोजी पहाटे ५.३० वाजता काकडारंती, सकाळी ७ ते ८ नामस्मरण, १० ते १२ रुद्रस्वाहाकार, पूर्णाहुती, नैवेद्य, आरती, मंत्रपुष्प व प्रसाद वितरण होईल. सायंकाळी ६ वाजता श्रींची शोभायात्रा, मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली, खडेबाजार, बँक ऑफ इंडियामार्गे फिरून पुन्हा मंदिरापर्यंत येईल. तेथे आरती व प्रसाद वितरण होईल. गुरुवार दि. २१ रोजी पहाटे ५.३० ते ६.३० काकडारती, नामस्मरण, ८.३० ते ९.३० ब्रह्मवृंदाकडून श्रींच्या मूर्तीस व पादुकास लघुरुद्राभिषेक, त्यानंतर अलंकार पूजा होईल. सकाळी १०.३० ते ११.३० श्री सत्यचिदंबर पूजा, देवीस कुंकुमार्चन, भजन, प्रवचन, स्वामींचा जन्मोत्सव, पुष्पवृष्टी, महानैवेद्य, महाआरती होईल. दुपारी १ ते ४ महाप्रसाद होईल. सायंकाळी ६ ते ८ संगीत कार्यक्रम व रात्री ८.३० वाजता कार्तिक दीपोत्सव व आरती झाल्यानंतर प्रसाद वितरण होईल. भाविकांनी लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे