बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावच्यावतीने १५ डिसेंबर रोजी इन्फंट्रीच्या माजी सैनिकांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत शिवाजी स्टेडियम येथे हा मेळावा होणार आहे.या मेळाव्यादरम्यान मराठा लाईट इन्फंटीच्या माजी सैनिकांच्या पेन्शन तसेच इतर समस्यांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जाणार आहे. याचबरोबर सैनिकांसाठी वैद्यकीय शिबिर तसेच रेकॉर्ड उपलब्ध करून दिले जाणार असल्याने यावेळी माजी सैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
मराठा इन्फंट्रीतर्फे १५ डिसेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन
By Akshata Naik
Must read
Previous articleशहापूर येथे गुरुवारी चिदंबर जन्मोत्सव
Next articleयुवासेनेच्यावतीने किल्ला स्पर्धेचे आयोजन