अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन दिवस हुंडीतील दान जमा
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील उगारगोळ जवळील श्रीक्षेत्र रेणुका यल्लमा मंदिराच्या हुंडीतील मोजण्याचे काम झाले असून दानपेटी मध्ये १.०४ कोटी रुपयांचा संग्रह झाला.
यामध्ये ५.२२ लाख रुपयांचे ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने, १.२७ लाख रुपयांचे १,२७६ ग्रॅम चांदीचे दागिने आणि ९८.२३ लाख रुपयांची रोख रक्कम समाविष्ट आहे, असे यल्लम्मा मंदिर प्राधिकरणाचे सचिव अशोक दुडगुंटी यांनी माहिती दिलीय .
सौदत्ती येथील यल्लम्मा मंदिरात देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक येतात. त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर, ते मंदिराच्या हुंडीत केवळ रोख रक्कमच नाही तर सोने आणि चांदीचे दागिने देखील दान करून मागणी तकरतात. अशा प्रकारे, भाविकांनी हुंडीत टाकलेल्या दानाची गणना करण्यात आली.
यल्लम्मा मंदिर प्राधिकरणाचे सचिव, मंदिर अधिकारी, बेळगावचे जिल्हाधिकारी, धार्मिक बंदोबस्त विभागाचे कार्यालय, सौदत्ती चे तहसीलदार कार्यालयाचे कर्मचारी आणि सौदन्ती पोलिसांच्या उपस्थितीत या दान पेटी फोडण्यात आल्या.