कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री सौ लक्ष्मीताई हेबाळकर
यांच्या निवासस्थानी ज्योती अथलेटिक्स स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडू, संचालक, पालक यांनी भेट घेऊन सदिच्छा व्यक्त केल्या, कर्नाटक राज्य ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने बेंगलोर येथील कांठीरिवा मैदानात घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये विशेष कामगिरी केलेल्या ज्योती अथलेटिक्स स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंचा ताईंच्या हस्ते सन्मान करण्यात आला, सहभागी खेळाडूंना दोन दिवस बेंगलोर येथे वास्तव्यास मॅडमचे विशेष सहकार्य लाभले, त्यांच्या या सहकार्याबद्दल क्लबचे अध्यक्ष श्री एल जी कोलेकर यांनी विशेष आभार मानले, यावेळी क्लबचे सर्व खेळाडू संचालक पालक उपस्थित होते
ज्योती अथलेटिक्स स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूना मंत्री हेब्बाळकर यांच्या सदिच्छा
