बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील चिक्कनंदी गावाच्या बाहेर एका प्रेमीयुगुलाने ऑटोमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
आत्महत्या केलेलला राघवेंद्र जाधव (२८) आणि रंजीता चोबरी (२६) अशी असून, हे दोघेही बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील मुन्नवळी गावचे रहिवासी होते. दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते.
मात्र १५ दिवसांपूर्वी रंजीता दुसऱ्या मुलाशी साखरपुडा झाल्याने, तिच्या घरच्यांनी हे प्रेम मान्य न केल्याने दोघांनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
१५ दिवसांपूर्वी रंजीता झाला होता दुसऱ्या मुलाशी साखरपुडा-ऑटोमध्ये प्रेमीयुगुलाची आत्महत्या
