प्रेमाच्या जाळ्यात अडकून तरुणीला अनैतिक व्यवसायात अडकवलेल्या नराधम तरुणाला सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेतल्याची घटना अनगोळ येथे घडली आहे.
बेळगावातील काही समाजसेविका आणि पोलिसांनी संयुक्तरित्या प्रकरणाचा पडदा फाश केला आहे. या घटनेने बेळगावसह शहर पोलीसात खळबळ माजली आहे. बैलहोंगल तालुक्यातील वीरांना रुद्राप्पा हूनशी (वय 35) या इसमाने लग्नाचे आमिष दाखवून पूर्व भागातील एका युवतीला पळवून नेऊन अनगोळ परिसरात खोली करुन ठेवण्यात आले होते. त्यानंतर वीरांना या नराधमाने त्या युवतीकडे इतर व्यक्तींना पाठवून देऊन अनैतिक व्यवसायाला लावण्यात चा प्रकार सुरू केला होता. यातून सुटका करून घेण्यासाठी त्या युवतीने खट्टापीठा सुरू ठेवला होता. ही माहिती एका अनोळखी महिलेला समजताच या महिलेने दक्षिण भागातील समाजसेसेविकांशी संपर्क साधून ही माहिती दिली .
त्या समाज सेविकेने महिला पोलिसांशी संपर्क साधून सापळा रचण्यात आला आणि त्या नराधामाना व त्याचा सहकारी मारुती कृष्णा बुवाजी (वय 36) या दोघांना गिराईकच्या संपर्क साधताना रंगेहात पकडून पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले .या दोघांचीही कसून चौकशी करून अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आणि यानंतर या युवतीची यातून सुटका करण्यात आली आहे